मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ती रनरअप ठरली होती. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन झाले आहे. त्यामुळे तिच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

अपूर्वा नेमळेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने त्याच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहे. त्याबरोबर तिने भावूक पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा : Video : ‘पंढरीच्या विठूराया वारी नाही हे वाईटच झालं, पण…’ लहान मुलाने म्हटली संकर्षण कऱ्हाडेच्या नाटकातील कविता, व्हिडीओ व्हायरल

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

“माझा प्रिय भाऊ ओमी,

आयुष्यात कधी कधी नुकसान, तोटा होत असतो. यात आपण काहीही बदल करु शकत नाही. पण तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. खरं सागूं तर मी तुला निरोप द्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायलाही तयार नव्हते. एक दिवस किंवा एका सेकंदसाठी मी काहीही द्यायला तयार होते. पण मृत्यूबद्दलचं एक सत्य म्हणजे, प्रेम कधीच मरत नाही, म्हणून मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे. काही नातेसंबंध हे कधीच तोडता येत नाही.

कारण जरी शारीरिकदृष्ट्या तू इथे नसला तरी तुझे हृदय इथेच असेल, ते माझ्याजवळ कायमच राहील. तू नेहमीच माझ्याबरोबर असशील. आपण पुन्हा कधीतरी नक्कीच भेटू आणि तिथे आपल्याला वेळ किंवा जागाही वेगळं करु शकत नाही. पण त्या दिवसापर्यंत तुझे हृदय कायमच माझ्याबरोबर असेल. काही हृदयं ही फक्त एकत्र येतात आणि त्यात काहीच बदल होत नाही. माझे तुझ्यावर प्रेम होते, प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल. तू माझ्या मनात, हृदयात कायमच असशील. माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू. Rest in peace”, अशी पोस्ट अपूर्वा नेमळेकरने केली आहे.

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

अपूर्वा नेमळेकरच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत हे कसं झालं, असा प्रश्न तिला विचारला आहे. त्यावर अपूर्वाने तो २८ वर्षांचा होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले, असे कमेंट करताना म्हटले आहे. तर अनेकांनी तिच्या पोस्टवर श्रद्धांजली वाहिली आहे.

Story img Loader