‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. सध्या ती बिग बॉसमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. तिचे खासगी आयुष्य फारच चर्चेत राहिले आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती कायमच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती चाहत्यांच्या संपर्कांत राहण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ‘बिग बॉस’मध्ये जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला होता. यात तिने तिच्या सिंगल असण्याबद्दलही भाष्य केले होते.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Ramdas Athawale
Ramdas Athawale : अमित शाह यांच्या ‘त्या’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस जाणूनबुजून…”
Deepti Naval recalls meeting Raj Kapoor
“राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेलेली मी एकमेव महिला…”, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य
Sonakshi Sinha hits back at Mukesh Khanna
मुकेश खन्ना यांचा शत्रुघ्न सिन्हांच्या संस्कारावर प्रश्न; भडकलेली सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “यापुढे काही बोलाल…”
supriya sule News
Supriya Sule : “बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

काही महिन्यांपूर्वी अपूर्वाने इन्स्टाग्रामवर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने तिच्या चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली होती. अपूर्वाला नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले होते. तिनेही चाहत्यांच्या या प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तर दिली होती. या कार्यक्रमात अपूर्वाला ‘तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. त्यावर तिने फारच स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते.

Apurva Nemlekar
अपूर्वा नेमळेकरचं उत्तर

या प्रश्नाला उत्तर देताना अपूर्वा म्हणाली, “मी सध्या तरी सिंगल आहे. त्यात मी आनंदी आहे. पण तरीही मी माझ्या प्रिय व्यक्तीची वाट बघतेय. तिचे हे उत्तर आणि याचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल झाला होता. त्याची चर्चाही रंगली होती.

Apurva Nemlekar 1
अपूर्वा नेमळेकरचं उत्तर

आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

दरम्यान सध्या अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉस या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होती. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले. तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम भूमिका साकारली आहे.

Story img Loader