दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टार प्रवाह परिवार लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. यंदा आरती घराघरातली असे ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३’ या गणपती विशेष कार्यक्रमाची थीम आहे. यानिमित्ताने सर्वच मालिकेतील कलाकार हे जय्यत तयारी करताना दिसत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सावनी या भूमिकेत झळकणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अपूर्वा नेमळेकरने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव स्पर्धेसाठी छान नटल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत तिला दुर्वाची जुडी बांधण्याचा एक टास्क दिल्याचे पाहायला मिळत आहे. यात तिला एक फुगा दिला आहे. तो जमिनीवर खाली पडू न देता तिला दुर्वांची जुडी बांधावी लागणार आहे, असा टास्क तिला देण्यात आला आहे.
आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

या टास्कसाठी अपूर्वा नेमळेकरची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. तिनेही हा टास्क पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे तिने सुंदर पद्धतीने दोन दुर्वांची जोडी बांधल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”

दरम्यान अपूर्वा नेमळेकर ही सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. अपूर्वानेही दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत अपूर्वा नेमळेकर ही सईच्या आईची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे.

Story img Loader