अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ती रनरअप ठरली होती. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. सध्या अपूर्वा एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती आणि एक लहान मुलगी पाहायला मिळत आहे. सध्या तिचा हा फोटो व्हारल होत आहे.
आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”

“या रात्रींची मी आतुरतेने वाट पाहत असते. अदिका माझी राजकुमारी, माझी प्रिय छोटी भाची याला ती ‘लव्ही लव्ही नाईट्स’ असं म्हणते”, असे कॅप्शन अपूर्वाने दिले आहे.

अपूर्वाच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. “तुमची मुलगी आहे का? खूप गोड आहे, तुमच्यासारखीच”, असे त्याने कमेंट करताना म्हटले आहे. त्यावर अपूर्वाने “भाची आहे” असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

apurva nemlekar comment
अपूर्वा नेमळेकरची कमेंट

आणखी वाचा : “आदल्या दिवशीचा चिकनचा रस्सा, शिळी भाकरी अन्…” दुबईत फिरणाऱ्या मराठी अभिनेत्याला येतेय मराठमोळ्या खाद्यपदार्थांची आठवण, म्हणाला…

दरम्यान अपूर्वा नेमळेकर ही कायमच तिची भाची अदिकाबरोबर फोटो शेअर करत असते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव पाहायला मिळतो.

Story img Loader