‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. त्यानंतर ती फारच लोकप्रिय ठरली. आज अपूर्वाचा वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो बिग बॉसमुळे अपूर्वा प्रसिद्धीझोतात आली आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.

बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. तिचे खासगी आयुष्य फारच चर्चेत असते. अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या सिंगल असण्याबद्दल बोलली आहे. विविध कार्यक्रमातही तिने याबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?

election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Chandrashekhar Bawankule statement on Criteria for opposition leaders to join ruling party
सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ‘हे’ निकष… चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
bangladeshis issue in chhatrapati sambhajinagar municipal corporation
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बांगलादेशींच्या मुद्द्याची व्यूहरचना; भाजप. शिवसेना, एमआयएमला विषय मिळाला
Nitish Kumar and Chandrababu Naidu on UGC
यूजीसीच्या मसुद्यावरून एनडीएमध्ये अस्वस्थता; जेडीयूची स्पष्ट नाराजी, तर टीडीपी, लोजपकडून सावध पवित्रा

7

पण अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तिचे हे नाते फार काळ टिकले नाही. त्यांचा घटस्फोट झाला. अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.

अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. ते दोघेही मुंबईत लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. 

आणखी वाचा : “मी त्यादिवशी कायम रडते कारण…” वाढदिवसाबद्दल बोलताना अपूर्वा नेमळेकरने व्यक्त केली खंत

अपूर्वाचा पूर्वाश्रमीचा पती रोहन देशपांडे हे राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. रोहन देशपांडे हे शिवसेनेचा पदाधिकारी आहेत. ते सोशल मीडियावर कायमच विविध फोटो शेअर करताना दिसतात. रोहन हे दादर परिसरात वास्तव्यास आहेत. ते अनेक सामाजिक कार्यात सहभागी होताना पाहायला मिळते. रोहन हे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना ओळखतात. त्याने सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकारांबरोबर फोटो शेअर केले आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोहन उपस्थिती लावताना दिसत असतात.

तर दुसरीकडे अपूर्वाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होती. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले. तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम काम केले आहे. या बरोबरच अपूर्वा ही ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत राणी चेंनम्मा यांच्या भूमिकेत झळकली होती. ही तिची पहिलीच ऐतिहासिक भूमिका होती.

Story img Loader