‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच तिची ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत एन्ट्री झाली. या मालिकेमध्ये तिनं खलनायिका सावनीची भूमिका साकारली आहे. यापूर्वी ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने आज बिग बॉसमधील आठवणींना उजाळा दिला आहे.
हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? एक आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री तर दुसरी भारतातील प्रसिद्ध खेळाडू
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या चौथ्या पर्वात झळकली होती. याच पर्वातील एक व्हिडीओ शेअर करत तिनं लिहीलं आहे की, “गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन ४ सुरू झालं होतं. आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तसे पाहता बिग बॉसमध्ये १०० दिवस टिकून राहणं म्हणजे एक मोठा खडतर, दिव्यप्रवास असतो. मात्र या शंभर दिवसात मला माझ्यामधली मी जशी आहे तशी आणि माझा मूळ स्वभाव जसा आहे तसा प्रेक्षकांना पाहता आला. यापूर्वी अनेक मालिका, नाटक, चित्रपटांद्वारे वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर माझा अभिनय सादर केला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद ही दिला. तथापि बिग बॉस एक असा कार्यक्रम आहे. तिथं आपल्याला अभिनय करता येतं नाही. त्यामध्ये तुम्ही मूळ जसे आहात तसेच प्रेक्षकांना दिसता. जे अभिनय करतात किंवा खोटं खोटं वागण्याच्या प्रयत्न करतात ते लवकरच घराबाहेर जातात.”
हेही वाचा – केतकी माटेगावकरची आहेत मजेशीर टोपण नावं; अभिनेत्री म्हणाली…
“मी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी कोणतीही स्ट्रॅटेजी ठरवली नव्हती. मी माझे मन, मनगट, आणि मेंदू या 3M तत्त्वाचा वापर केला. यापूर्वी मी जी भूमिका केली होती तशीच मी प्रेक्षकांना वाटले. पण माझा मूळ स्वभावानुसार मला खोटं वागता येत नाही, खोटं बोलता नाही. मी स्वतःचा स्वाभिमान खूप जपते. त्यामुळे मी जे बोलते तेच करते आणि तशीच वागते. त्यामुळेच मी १०० दिवस टिकले आणि म्हणूनच बिग बॉसने मला “लेडी ऑफ वर्डस” हा किताब दिला. बिग बॉसच्या प्रवासात अनेक चांगले, वाईट अनुभव आले. चेहऱ्यावर हसू आणून खोटी स्तुती करणारे मित्र भेटले आणि आयुष्यभर जिवापाड जीव लावणारे मित्र, मैत्रिणी सुध्दा भेटल्या. हार जीत तर प्रत्येक ठिकाणी असतेच. भले मी ती ट्रॉफी जिंकली नाही. पण करोडो प्रेक्षकांची मनं मात्र नक्कीच जिंकली. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते,” असं अपूर्वाने लिहीलं आहे.
हेही वाचा – कोकणची शान नेहा पाटीलला मिळाला लावणी सम्राज्ञीचा मान; ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती
हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला होता. या पर्वात अपूर्वा आणि अक्षय व्यतिरिक्त किरण माने, योगेश जाधव, समृद्धी जाधव, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, विकास सावंत, तेजस्विनी लोणारी असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळाले होते.