‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती खलनायिकेची भूमिका साकारत आहे. आता अपूर्वाने प्रेमाची गोष्ट ही मालिका का निवडली यामागचे कारण सांगितले आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे. नुकतंच अपूर्वा नेमळेकरने ‘टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत अपूर्वाने ही मालिका का स्वीकारली? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

“बिग बॉस संपल्यानंतर मी एका आव्हानात्मक भूमिकेची वाट पाहत होते. मला याआधी तीन मुख्य भूमिकांसाठी विचारणा करण्यात आली होती. पण मी अशी व्यक्ती नाही, जी सतत तेच पात्र किंवा त्याच गोष्टी करत राहील. मला विचारण्यात आलेली पात्र मला रुचली नाहीत. तसेच ती अजिबात प्रेरणादायी वाटली नाही”, असे अपूर्वाने सांगितले.

“त्यानंतर जेव्हा मला प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या निर्मात्यांनी विचारणा केली, तेव्हा मला वाटले की हीच ती भूमिका आहे, ज्याची मी इतके दिवस वाट पाहत होते. सावनी हे फारच अनोखे नकारात्मक पात्र आहे. ज्याला विविध छटा आहेत. त्यामुळे मी त्याला होकार दिला”, असेही ती म्हणाली.

आणखी वाचा : रिंकू राजगुरुच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट झाल्या गायब, कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा नेमळेकर ही सईच्या आईची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेनं ‘ठरलं तर मग’, ‘आई कुठे काय करते’ अशा लोकप्रिय मालिकांना मागे टाकलं आहे.

Story img Loader