आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १ मार्चला प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं कौतुक कलाकार मंडळींसह अनेक प्रेक्षक करत आहेत. भाईजान सलमान खाननेही या चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. चित्रपटाची कथा, दिग्दर्शनाची मांडणी, कलाकारांचा अभिनय याविषयी चर्चा होतं आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीने देखील किरण रावच्या कामाचं कौतुक केलं आहे. ज्यावर किरणने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री अश्विनी कासारने इन्स्टाग्राम स्टोरीवर किरण रावसहचा फोटो शेअर करत तिच कौतुक केलं आहे. “मला किरण रावला भेटून खूप आनंद झाला. मी तिच्या व तिच्या कामाच्या प्रेमात पडली आहे.”
हेही वाचा – Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाचा जबरदस्त डान्स पाहिलात का? कलाकार मंडळीही म्हणाले, “खतरनाक…”
अश्विनीची हिच पोस्ट किरण रावने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. किरणने यावर लिहिलं आहे, “तुला भेटूनही खूप आनंद झाला.” किरण रावची ही स्टोरी पुन्हा अश्विनी पोस्ट करत म्हणाली, “अजून काय हवं…??”
हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला झाले ३ महिने पूर्ण, ‘असा’ साजरा केला दिवस, पाहा फोटो
दरम्यान, अश्विनी कासारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने सहाय्यक पोलीस आयुक्तांची भूमिका साकारली आहे. याआधी अश्विनीने अनेक मालिका, नाटकात काम केलं आहे. ‘कमला’ ही तिची मालिका प्रचंड गाजली होती.