काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरला म्हाडाचं घरं लागलं होतं. कळव्यातलं घर सोडून तो स्वप्नातल्या घरात राहायला गेला. त्यानंतर आता ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी कासारला म्हाडाचं घर लागलं आहे. तिने हक्काच्या घराचा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अभिनेत्री अश्विनी कासारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कुटुंबीयांबरोबर नव्या घरात पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं…हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय…खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच.”
हेही वाचा – राज हंचनाळेची खरी बायको तेजश्री प्रधानला फोन करून करते ‘ही’ तक्रार, अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…
“काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही. नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. रात्री बेरात्री केलेला प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय. सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे. ‘मुंबई’ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय…माझं घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार…तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू…भावना समजून घ्याल याची खात्री आहे…- अश्विनी कासार,” असं अश्विनीनं लिहिलं आहे.
अश्विनीच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कैलाश वाघमारे, ऋतुजा बागवे, साक्षी गांधी, अविनाश नारकर, गौरी कुलकर्णी, रेश्मा शिंदे, स्पृहा जोशी, मयुरी वाघ अशा अनेक कलाकार मंडळींनी अश्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अनेक मालिकांबरोबर चित्रपटातही झळकली होती. ‘कमला’, ‘मोलकरीण बाई’, ‘सावित्रीजोती’ या मालिकांमध्ये अश्विनी पाहायला मिळाली होती.