मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अतिशा नाईक यांना ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये विविध पात्र साकारली आहेत. अतिशा नाईक यांना कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. नुकतंच त्यांनी रंगावरुन होणाऱ्या भेदभावाबद्दल भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिशा नाईक यांनी नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या रंगावरुन कधी भेदभाव करण्यात आला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “लव्ह यू…”, स्नेहल शिदमच्या ‘त्या’ फोटोवर निखिल बनेच्या कमेंटने वेधलं लक्ष

“माझे आई-बाबा सावळे होते. मी जर गोरी झाले असते तर माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडले गेले असते. मी काळी-सावळी जशी आहे तशी सर्वोत्तम आहे. मी माझ्या रंगामुळे फारच आनंदी आहे. मी एकदाही गोरं व्हायचं क्रीम लावलेलं नाही”, असे अतिशा नाईक म्हणाल्या.

“मी गोरी नाही. माझी आजी आईची आई ही गोरी होती. पण ठीक आहे. त्याचं मला स्वत:ला काहीही वाटत नाही. मी कुठलाच भेदभाव करत नाही. मी काळी आहे किंवा गोरी, तुम्हाला नाही आवडत तर तो तुमचा मुद्दा. असं करुन मी सोडून देते”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “…मग सवाई महोत्सवाला १० पर्यंतच परवानगी का?” गणेशोत्सवाच्या ‘त्या’ नियमावर वैभव मांगलेंचा संताप

दरम्यान अतिशा नाईक या काही दिवसांपूर्वी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत झळकल्या होत्या. या मालिकेत त्यांनी मंगल म्हणजेच जयदीपच्या आईचे पात्र साकारलं होतं. त्यांच्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress atisha naik talk about color discrimination said i like my color nrp
Show comments