छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. त्यानतंर आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत तिने छान वनपीस, डेनिम जॅकेट परिधान केले आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “स्पष्ट पुरावे मिळूनही कारवाई नाही”, बहिणीच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “तिच्या चेहऱ्यावर…”

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bigg Boss Marathi Season 5 Ankur wadhave reaction on aarya jadhao thrown out of the house of slaping nikki
“‘निक्की बिग बॉस मराठी’ असं नाव घोषित करा”, आर्याला घराबाहेर काढल्यामुळे लोकप्रिय अभिनेता भडकला, निषेध करत म्हणाला…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!

“मी पुन्हा खंबीर होते आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही मला असेच पाहू इच्छिता”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. यावेळी एका चाहत्याने कमेंट करत तिच्या हातावर झालेल्या जखमेबद्दल विचारले आहे. त्यावर तिने ती जखम कशामुळे झाली, ते सांगितले आहे.

तिच्या या फोटोवर एकाने “हाताला काय लागलंय”, असा प्रश्न तिला विचारला आहे. याला तिने उत्तर दिले आहे. “मांजरीचे नखं लागलं आहे”, असे तिने म्हटले. त्यावर त्या चाहत्याने “अच्छा, मग ठिक आहे”, असे म्हणत स्माईल इमोजी शेअर केला आहे.

भाग्यश्री मोटेची कमेंट

Video : नागराज मंजुळेंना ‘अण्णा’ अशी हाक पहिल्यांदा कोणी दिली होती? स्वत:च केला खुलासा

दरम्यान भाग्यश्री ही ‘देवयानी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ‘देवा श्री गणेशा’ या मालिकेतही झळकली होती. ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘पाटील’. ‘काय रे रास्कला’ या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.