छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं. आज मधू मार्कंडेय यांच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्री मोटेने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि तिची बहिण आनंदात वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. या वाढदिवसाच्या केकवर बाळा असेही लिहिले आहे. तिने ही पोस्ट करत त्यावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा : “स्पष्ट पुरावे मिळूनही कारवाई नाही”, बहिणीच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “तिच्या चेहऱ्यावर…”
भाग्यश्री मोटेची पोस्ट
“हा तुझा आमच्यासोबतचा शेवटचा वाढदिवस आणि त्याचे हे फोटो! तू माझं खरं प्रेम आहेस. तू माझी आहेस, होतीस आणि कायमच राहशील. भूतकाळात काय घडलं, याचा उल्लेख करणं हे फारच त्रासदायक आहे. आपण नियतीमुळे वेगळे झालो असलो, तरीही मनाने कायमच एकत्र आहोत.
तुझ्या विचारांशिवाय आणि आठवणींशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. वाढदिवस हा तुझ्या आवडीचा प्रसंग आहे आणि आज मला तुझी खूप आठवण येतेय. आम्ही तुझा वाढदिवस नक्कीच साजरा करु, कारण बाळ तुझ्यासाठी आम्ही ते केलेच असते. तू जिथे असशील तिथे पार्टी होत असेल. तू नेहमी आमच्याबरोबर असशील, अशी भावूक पोस्ट भाग्यश्रीने केली आहे.
आणखी वाचा : “तुझ्या हाताला काय लागलंय?” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट, म्हणाली…
दरम्यान भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं. मात्र तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. शिवाय मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला जात आहे.