लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सफरचंद’ नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या नाटकाबद्दल एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने हे नाटक कसं वाटलं याबद्दल सांगितले आहे.
मराठी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच भक्तीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ‘सफरचंद’ या नाटकाचे कलाकार दिसत आहे. याला कॅप्शन देताना तिने नाटकाबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”
भक्ती रत्नपारखीची पोस्ट
“काल सफरचंद नाटक बघण्याचा योग आला. हे नाटक बघायलाच पाहिजे ते त्याच्या नेपथ्यसाठी, प्रकाश योजनेसाठी, सादरीकरणासाठी…. अप्रतिम टीमवर्क, सगळ्या टीमची नाटकासाठी असलेली passion.. पडदा उघडताच पैसे वसुल होतात.. इतका अप्रतिम सेट आहे… नक्की बघायला पाहिजे अस हे नाटक आहे.
‘सफरचंद’
अप्रतिम नाटक
अप्रतिम नेपथ्य
अप्रतिम सादरीकरण
सगळ्या टीम चे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा”, असे भक्ती रत्नपारखीने म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी
दरम्यान भक्ती रत्नपारखी ही ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेद्वारे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने निरागस स्वभाव आणि तितकीच खोडसाळ दाखविलेल्या मॅडीची भूमिका साकारली होती. आता सध्या ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत झळकत आहे. यात ती देवकी हे पात्र साकारत आहे.