मराठी मालिका आणि चित्रपटविश्वात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भार्गवी चिरमुले. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. भार्गवीनं मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. आता नुकतंच तिने तिला प्रवासादरम्यान आलेला एक भयानक अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भार्गवीने नुकतंच मीडिया टॉक मराठी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्य, सिनेसृष्टीतील प्रवास यांसह विविध गोष्टींवर भाष्य केले. यावेळी तिने तिला एका रात्रीच्या प्रवासावेळी आलेला अनुभव याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “दुसरं लग्न कधी करणार?” तेजस्विनी पंडित म्हणाली, “माझ्या आयुष्यात पुरुष…”

“एकदा मी रात्री एकटी गाडीने प्रवास करत होते. मला नेमकं कुठे जायचं याचा रस्ता सापडत नव्हता. मी त्यावेळी खूप घाबरले होते. मला खूप भीती वाटत होते. त्यावेळी अचानक समोरुन दोन माणसं मला बाईकवरुन येताना दिसली. मी त्यांना रस्ता विचारला आणि पुढे जाऊ लागले. यानंतर थोड्यावेळाने ती माणसं बाईकने माझा पाठलाग करत आहेत, असं मला जाणवलं.मी गाडीत एकटी आहे हे त्यांना माहिती होते. मी तेव्हा प्रचंड घाबरले होते. जर मी आता इथे रस्ता चुकले, तर काय होईल, याची मला स्वत:लाही खात्री नव्हती. त्यावेळी गुगल मॅप वैगरे काहीच नव्हतं. मी रस्ता चुकलेय, हे त्यांना कळलं होतं. त्यांनी मला ओळखलं वैगरे असं काही नव्हतं. ते बराच वेळ माझ्या मागे बाईकने येत होते.

कदाचित ते दोघे मला रस्ता दाखवण्यासाठी माझ्या मागे येत असावेत. पण मला प्रचंड भीती वाटत होती. मी भरधाव वेगाने गाडी पळवत होते. एका क्षणानंतर मला जाणवलं की ते बाईकने येतात, ते मला पटकन कट मारुन पुढे बाईक घेऊन येऊ शकतात. मी त्यानंतर शांत झाले. गाडीचा वेग कमी केला, पाणी प्यायले आणि त्यानंतर विचार केला की आता जे होईल ते होईल. मी जगणार आहे आणि मला जगायचं, जे होईल ते होईल, कारण घाबरुन काहीच होणार नाही.

मी अतिवेगाने गाडी चालवली तर मला इजा होऊ शकते, एखाद्या समोरच्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो, याचा मी विचार केला. त्यानंतर मी शांत होऊन माझ्यातील बळ एकवटलं. बाई म्हणून आपण घाबरायचं नाही आणि जे काय होईल त्याचा सामना करुया, असं मी ठरवलं. यानंतर ती दोन माणसं बाईक घेऊन बाजूने गेली, त्यावेळी मी त्यांना हात दाखवला आणि मी माझं शोधेन, असं त्यांना इशारा करुन सांगितलं. यानंतर ते दोघेही वेगळ्या रस्त्याने निघून गेले. ते कदाचित माझी मदतही करत असावेत. पण त्या दहा मिनिटांच्या काळात मी काय करु, असा प्रश्न मला पडला. त्यावेळी मी माझ्या आतून जो आवाज आला त्यामुळे मी ते करु शकले. माझ्यासाठी तो दहा मिनिटांचा काळ खूपच भयानक होता”, असा किस्सा भार्गवी चिरमुलेने सांगितला.

आणखी वाचा : “पहिलाच सिन होता, स्क्रीप्ट हातात आलं अन्…”, किरण मानेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाले “मी ज्यांची भूमिका…”

दरम्यान भार्गवी ही सध्या तिच्या युट्यूब चॅनलमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचे नवीन युट्यूब चॅनल सुरु केले आहे. यावर ती अनेक कलाकार, सामाजिक व्यक्तींच्या मुलाखती घेताना दिसते. त्याआधी तिने कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत काम केले होते. यात तिने मुलीबद्दल अत्यंत पझेसिव्ह, ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि धाकात ठेवणाऱ्या आईची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress bhargavi chirmuley share night journey story when she traveling alone nrp
Show comments