‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून धनश्री काडगावकरला ओळखले जाते. धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. सध्या ती ‘तू चाल पुढं’ या मालिकेत झळकत आहे. धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच धनश्रीने नवीन घर खरेदी केलं आहे. आता तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
धनश्रीने गणेशोत्वाच्या काळात ठाण्यात दोन नवीन घरं खरेदी केली. या घरात सध्या इंटेरिअरच काम सुरु आहे. नुकतंच तिने या घराचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या नवीन घरात लवकरात लवकर राहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “घर घेतलं, पण इंटेरिअरसाठी पैसे नाहीत”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व्यक्त केलं दु:ख, म्हणाली “माझा नवरा…”
“मी नुकतीच माझ्या घरी जाऊन आले. आम्ही इंटेरिअरच्या अनेक गोष्टी या ठरवल्या आहेत. पण हे फार धकाधकीचं आहे. प्रत्येकवेळी तिकडे गेल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत असतो. मी या सर्व प्रक्रियेचा आनंद घेतेय. याचा फार थकवाही जाणवतोय.
मी अशी आशा करतेय की लवकरात लवकर माझं घर तयार होईल आणि मी तिथे राहायला जाईन. कारण आता सध्या मी भाड्याच्या घरात राहते. माझ्या घराचं भाडं खूप जास्त आहे. त्यामुळे जर माझं नवीन घर लवकर तयार झालं, तर मला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे माझं घराचं भाडंही वाचेल”, असे धनश्रीने यावेळी सांगितले.
आणखी वाचा : Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक
दरम्यान सध्या धनश्री ‘तू चाल पुढे’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती शिल्पी हे पात्र साकारत आहे. धनश्रीने मोठ्या ब्रेकनंतर या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पुनरागमन केले. त्याबरोबरच काही महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे.