Marathi Actress : गेल्या काही महिन्यांपासून कलाकार मंडळी आपलं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करताना दिसत आहेत. अभिनेत्री शिवाली परब, अदिती द्रविड, रुपाली भोसले, रुचिरा जाधव, अश्विनी महांगडे, योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी मायानगरी मुंबईत नवं घर घेतलं. काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी ठाण्यात आलिशान घर घेतलं. त्यानंतर आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने ठाण्यात नवं घर घेतल्याचं समोर आलं आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका होती. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही अजून ही मालिका चर्चेत असते. या मालिकेतील कलाकार आता नवनवीन मालिका, चित्रपटात पाहायला मिळत आहेत. अशातच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील लाडकी अप्पू अर्थात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची ( Marathi Actress Dnyanada Ramtirthkar ) स्वप्नपूर्ती झाली आहे. तिने ठाण्यात नवं घर घेतलं आहे ( Dnyanada Ramtirthkar New Home ). याबाबत अद्याप ज्ञानदाने स्वतः जाहीर केलं नसलं तरी विविध एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेच्या माध्यमातून व्हिडीओ समोर आले आहेत.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

हेही वाचा – “अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी घटना”, केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणावर भरत जाधवांची पोस्ट, म्हणाले…

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ( Marathi Actress ) ठाण्यातील नव्या घरात आपल्या आई-वडिलांबरोबर गृहप्रवेश केला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत नव्या घरात कलश पूजन केलं. यावेळी ज्ञानदाचा आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं. आता ज्ञानदाने चाहते नवं घर घेतल्यानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा करत आहे.

Dnyanada Ramtirthkar New Home
Video Credit : DEVIKA NARENDRA MANJREKAR

हेही वाचा – Video: प्राजक्ता माळीसाठी पृथ्वीक प्रतापने शेअर केली खास पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “जोडी एकदम खतरनाक…”

ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच प्रथमेश परबसह झळकणार ‘या’ चित्रपटात

दरम्यान, ज्ञानदा रामतीर्थकरच्या ( Marathi Actress ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका बंद झाल्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ८ जुलैला प्रदर्शित झालेली ‘कमांडर करण सक्सेना’ वेबसीरिजमध्ये ज्ञानदा झळकली. आता लवकरच तिचा ‘मुंबई लोकल’ नावाचा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ज्ञानदासह अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप पाहायला मिळणार आहेत. बिग ब्रेन प्रोडक्शन्स निर्मित ‘मुंबई लोकल’ चित्रपटाच दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळींनी सांभाळली आहे. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Story img Loader