Marathi Actress : प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. नव्या मालिका सुरू करणं, जुन्या मालिकांमध्ये नवनवीन पात्रं आणून कथानक आणखी रंजक बनवणं हे सगळे ट्विस्ट सध्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. नुकतीच ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ या दोन अभिनेत्रींची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या पाठोपाठ नुकत्याच नव्याने सुरू झालेल्या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच एक नवीन मालिका सुरू झाली, या मालिकेचं नाव आहे ‘तू ही रे माझा मितवा’. या नव्याकोऱ्या मालिकेतून शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. २३ डिसेंबरला या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. पहिल्या दिवसापासून ईश्वरी अर्णवमध्ये होणारे वाद आणि एकंदर या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss 18 : “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ

स्टार प्रवाहच्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत लवकरच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव एन्ट्री घेणार आहे. यात ती कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. यापूर्वी रुचिरा ‘ठरलं तर मग’ मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती. तिने अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. आता ‘ठरलं तर मग’नंतर रुचिरा ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ

हेही वाचा : “Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ

आता रुचिराची एन्ट्री झाल्यावर मालिकेत काय ट्विस्ट येणार, ती कोणती भूमिका साकारणार याचा उलगडा लवकरच होईल. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे तिला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘बॉस मराठी ४’मध्ये सहभागी झाली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री छोट्या पडद्यावरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

Story img Loader