सध्या सर्वत्र अंबानींच्या घरच्या लग्नसोहळ्याची चर्चा चालू आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा येत्या १२ जुलै रोजी पार पडणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरला पार पडला होता. यावेळी रिहानासह अनेक हॉलीवूडचे सेलिब्रिटी भारतात आले होते. यानंतर या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीच्या क्रुझवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुद्धा बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली होती.

आता सध्या अंबानींच्या घरात अनंत-राधिकाचे लग्नाआधीचे विधी पार पडत आहेत. दोघांच्या नुकत्याच पार पडलेल्या संगीत सोहळ्याला हॉलीवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बिबरने खास परफॉर्मन्स सादर केला होता. रिपोर्ट्सनुसार यासाठी जस्टिनने तब्बल ८३ कोटी आकारल्याच्या चर्चा आहेत. अशातच जिओचे मोबाइल रिचार्ज सुद्धा महागले आहेत. त्यामुळे लेकाच्या लग्नासाठी अंबानींनी रिचार्जचे दर वाढवलेत अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहेत. तर, अनेक क्रिएटर्सनी यावर मीम्स देखील बनवले आहेत. याबाबत एका मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट सुद्धा चर्चेत आली आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…

हेही वाचा : “हिंदू-मुस्लीम लग्न करू शकत नाहीत का?” सोनाक्षी-झहीरच्या लग्नावर मुकेश खन्नांची प्रतिक्रिया; म्हणाले, “लव्ह जिहाद…”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर नुकतीच एक मजेशीर पोस्ट शेअर करत गौरीने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल भाष्य केलं आहे. “२९ रुपयांचं रिचार्ज केल्याचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात जाताना… अजून तुम्हाला याची जाणीव झाली नसेल पण, आम्हाला सगळं कळतं” अशी पोस्ट गौरीने इन्स्टाग्राम शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन, बॉलीवूड सेलिब्रिटींसह पंड्याही थिरकला रॅपरच्या गाण्यांवर

गौरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एक सिम वापरायची वेळ आलीये आता एवढा महाग झालाय रिचार्ज”, “हाच खरा व्यवसाय आहे”, “अनंत अंबानींच्या लग्नात खर्च झाला असेल”, “समजून घ्या मुलाचं लग्न आहे खर्च जास्त झालाय” अशा कमेंट्स गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर आल्या आहेत.

हेही वाचा : “ओ ओ जाने जाना…”, अंबानींच्या संगीत समारंभात सलमान खान व विकी कौशलचा एकत्र डान्स, हुकस्टेपने वेधलं लक्ष

दरम्यान, येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नाला बॉलीवूड कलाकारांसह अनेक परदेशी पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नातील हे समारंभ १४ जुलैपर्यंत चालू राहतील.

Story img Loader