दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीत घरोघरी रांगोळ्या, पणत्यांची आरास केली जाते. यंदा बाजारात अनेक डिझाईनर दिवे-पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. परंतु, या कृत्रिम पणत्यांकडे पाठ फिरवत एका मराठी अभिनेत्रीने मातीच्या पणत्या खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरला नेटकऱ्याने केले आक्षेपार्ह मेसेज; स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली, “अनेक पुरुष…”

‘स्वप्नांच्या पलीकडे’, ‘सूर राहू दे’ या मालिकांमधून अभिनेत्री गौरी नलावडे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या गौरीचा पणत्या विकत घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री रस्त्यावरच्या एका म्हाताऱ्या आजींकडून मातीच्या सुबक पणत्या विकत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या दुकानांमध्ये न जाता गौरीने रस्त्यावर पारंपरिक व मातीच्या पणत्या खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.

गौरी नलावडेने हा व्हिडीओ शेअर करत याला “यावर्षी दिवाळीत मी हाताने बनवलेल्या पणत्या खरेदी करण्यास प्राधान्य दिलं. आजी खूश, मी खूश…शुभ दीपावली!” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “ग्राहक न्यायालयात खटला दाखल करणार”, बॉलीवूड अभिनेत्याचे ‘टायगर ३’बद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानच्या…”

अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अवघ्या दोन दिवसांमध्ये या व्हिडीओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “अंधारातून प्रकाशाकडे…त्या आजीला नक्कीच मदत झाली असेल”, “छान अशा व्यक्तींची गरज आहे आज”, “शेवटी आजीने २ दिवे प्रेमाने दिले” अशा कमेंट्स करत अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader