‘माझा होशील ना’ मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी फोटो, कधी व्हिडीओ शेअर करत असते. तसंच आजूबाजूच्या घडामोडींवर देखील भाष्य करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी देशपांडेने मुंबईच्या ट्रॅफिकमधील एक कृती पाहून संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील ट्रॅफिकविषयी कलाकार मंडळी नेहमी व्यक्त होत असतात. घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकमध्ये अनेक तास अडकल्याचा अनुभव बऱ्याच कलाकारांनी घेतला आहे. अशा वेळी या कलाकारांनी व्हिडीओ करून सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे आता गौतमी देशपांडेने आपलं परखड मत मांडलं आहे. नेमकं गौतमी काय म्हणाली? काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “दारू, सिगारेट प्यायची असेल तर…”, सिद्धार्थ जाधवच्या आईने दिला होता मोलाचा सल्ला, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

गौतमी देशपांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणाली, “मी आता बीकेसी ते विलेपार्लेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे. तिथे मी होते आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. तर आपल्याकडे काय पातळीची हुशारी आहे. लोकांनी त्या उड्डाणपुलावर यू-टर्न घेतले. अत्यंत वेगाने जिथून गाड्या जात आहे, अशा ठिकाणाहून ते उलटे वन-वेने येत आहेत. या अशा लोकांवर काही कारवाई होतं नाही का? किंवा काही केलं जात नाही का? मला काही कळतं नाही. कारण ते अत्यंत रासरोसपणे उड्डाणपुलावरून यू-टर्न घेऊन मागे गेलेले आहेत. ज्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात. आपल्याला माहितीये ना, मुंबईत ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबायचं. हा मुर्खपणा करायचा नाही. असं करणारे तुम्ही बेअक्कल लोक आहात.”

हेही वाचा – Video: “गळ्यात मंगळसूत्र…”, ‘शाका लाका बूम बूम’ फेम किंशुक वैद्यच्या बायकोने घेतला जबरदस्त उखाणा, पाहा व्हिडीओ

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/Gautami-Deshpande.mp4

दरम्यान, गौतमी देशपांडे सध्या आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी गौतमी नवरा स्वानंद तेंडुलकरबरोबर युरोप फिरायला गेली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सारे तुझ्याचसाठी’ ही तिची पहिली मालिका होती. हर्षद अतकरीबरोबर या मालिकेत ती झळकली होती. त्यानंतर ती ‘माझी होशील ना’ मालिकेत पाहायला मिळाली. गौतमीची ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची आणि विराजस कुलकर्णीची जोडी तर चांगलीच हीट झाली. त्यानंतर गौतमी आणि विराजस ‘गालिब’ या नाटकात एकत्र काम करताना पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress gautami deshpande angry for this behavior public in mumbai traffic pps