अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवरा स्वानंद तेंडुलकरबरोबर गोव्याची ट्रीप एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ती गोव्याला ट्रीपसाठी गेली. याचे फोटो, व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. त्यानंतर नुकताच तिने गोव्याच्या ट्रीपवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमी मातीची भांडी तयार करताना दिसत आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे गेल्या वर्षी २५ डिसेंबरला स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नबंधनात अडकली. २३, डिसेंबरला गौतमीने मेहंदी समारंभाचे फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली होती. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. त्यानंतर लगेच हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक तिचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. मोठ्या थाटामाटात गौतमी-स्वानंदचा लग्नसोहळा झाला होता. दोघांच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या पाच महिन्यानंतर गौतमी-स्वानंद गोव्याच्या ट्रीपवर गेले आहेत.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

हेही वाचा – Video: अमृता खानविलकर चिडली संकर्षण कऱ्हाडेवर! नेमकं काय घडलं? पाहा

गोव्याच्या ट्रीपवरील गौतमीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती मातीची भांडी तयार करताना दिसत आहे. यावेळी गौतमी वेस्टर्न कपड्यांमध्ये पाहायला मिळत असून ती मातीची भांडी तयार करण्यात अगदी रमलेली आहे.

हेही वाचा – Video: जब्या-शालूचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुम्ही लग्न करा…”

गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सारे तुझ्याचसाठी’ ही तिची पहिली मालिका होती. हर्षद अतकरीबरोबर या मालिकेत ती झळकली होती. त्यानंतर ती ‘माझी होशील ना’ मालिकेत पाहायला मिळाली. गौतमीची ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची आणि विराजस कुलकर्णीची जोडी तर चांगलीच हीट झाली. सध्या गौतमी आणि विराजस ‘गालिब’ या नाटकात एकत्र काम करताना पाहायला मिळत आहेत. या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे.

हेही वाचा – Video: वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात एन्ट्री, अंबानी-मर्चंट कुटुंबाने केलं जंगी स्वागत

दरम्यान, गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आहे. ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो आहे. शिवाय त्याचा भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग असतो. गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. लग्नानंतर दोघं देखील आता ‘भाडिपा’च्या बऱ्याच व्हिडीओमध्ये एकत्र पाहायला मिळतात.

Story img Loader