कलाकार आणि सोशल मीडिया यांचं एक वेगळंच समीकरण जुळलं आहे. जरी कलाकार त्यांच्या कामापासून दूर असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. दैनंदिन जीवनातील अनुभव, फोटो, व्हिडीओ सातत्याने चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. एवढंच नाहीतर चालू घडामोडींवर देखील परखड मत मांडत असतात. त्यामुळे कलाकार त्यांच्या कामा व्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या अभिनेत्रीची बहीण देखील मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातली सुरुवात एका मालिकेने केली होती. त्यानंतर तिची दुसरी मालिका सुपरहिट झाली. त्यामधील तिच्या पात्राने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं. अजूनही या अभिनेत्रीने साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?

हेही वाचा – “तुम्ही अजूनही आहात..”, शाहीर साबळेंच्या स्मृतिदिनानिमित्ताने नातू केदार शिंदेंची भावुक पोस्ट, म्हणाले…

ही अभिनेत्री फक्त मालिकाच नाही तर नाटकात देखील काम करते. तिचं रंगभूमीवर सध्या ‘गालिब’ नावाचं नाटक सुरू आहे. आता तुम्ही ओळखचं असेल या फोटोमधील चिमुकली कोण आहे ते? ही गोड चिमुकली आहे गौतमी देशपांडे.

अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा सुंदर फोटो शेअर करून तिने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एवढंच नाहीतर तिने फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील बालपणीचा फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये छोटी गौतमी नर्सच्या वेशात पाहायला मिळत आहे. सध्या गौतमीचे हे बालपणीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – ओळख न देणं, अ‍ॅटिट्यूड अन्…, प्रिया बेर्डेंनी सध्याच्या कलाकारांच्या वागणुकीबाबत व्यक्त केली खंत, म्हणाल्या….

दरम्यान, गौतमी गेल्या वर्षी २५ डिसेंबरला स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नबंधनात अडकली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा गौतमी-स्वानंदचा झाला. गौतमीचा नवरा लोकप्रिय कंटेंट क्रिएटर असून ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो. याशिवाय त्याचा भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग असतो. गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.

Story img Loader