मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सई ताम्हणकर ही नुकतंच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी अभिनेत्री गिरीजा ओकने सईबद्दल खुपणाऱ्या गोष्टीचा खुलासा केला.

सई ताम्हणकर आणि गिरीजा ओक या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघींची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र आता नुकतंच गिरीजाने सई ताम्हणकरबद्दल खुपणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे. अवधूत गुप्तेने गिरीजा ओकचा एका व्हिडीओ दाखवत याबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “हा अधिक श्रावण आहे, यानंतर श्रावण लागेल”, चाहत्याच्या कमेंटवर प्रथमेश लघाटेने दिलं उत्तर, म्हणाला “तुमच्या माहितीसाठी…”

यात गिरीजा ओक म्हणाली, “जेव्हा जेव्हा सईच्या आयुष्यात प्रेम येतं, रोमान्स येतो, तेव्हा तेव्हा ती मला विसरते. म्हणजे तुझ्या आयुष्यात आताही जो रोमान्स आहे त्यावर माझं काहीच म्हणणं नाही, पण मला असं वाटतं की आता तो तसा जुना झाला आहे. तर आता परत ये माझ्याकडे… कारण शेवटी मी मेन आहे ना.”

आणखी वाचा : “त्यांनी वडा खाल्ला आणि…” ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

गिरीजाने केलेली ही प्रेमळ तक्रार ऐकून सई ताम्हणकर जोरजोरात हसू लागली. गिरीजासोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील सईबद्दल खुपणारी गोष्ट सांगितली आहे. सोनालीने म्हटलं की ती लोकांना जेवायला घरी बोलवते आणि मुद्दामून तासनतास उपाशी ठेवते. त्यावर सईने हा संपूर्ण किस्सा सांगितला.