Marathi Actress Hemal Ingle Bachelor Party : मराठी कलाविश्वात आता लग्नसराईला सुरुवात झालेली आहे. अभिषेक गावकर-सोनाली गुरव, शाल्व-श्रेया, रेश्मा शिंदे असे बहुतांश कलाकार येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीची लगीनघाई सुरू झालेली आहे. ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हेमल इंगळेला ओळखलं जातं. आता लवकरच हेमल बोहल्यावर चढणार आहे. तिचा साखरपुडा यावर्षी ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. सोशल मीडियावर अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत हेमलने साखरपुड्याची गोड बातमी सर्वांना दिली होती. आता लग्नाआधी ती आपल्या मैत्रिणींबरोबर बॅचलर पार्टीसाठी परदेशात गेली आहे. काही दिवसांपूर्वी हेमलने घरच्या घरी केक कापत लवकरच जंगी बॅचलर पार्टी करणार असल्याची हिंट सर्वांना दिली होती. आता अभिनेत्री आपल्या जवळच्या मैत्रिणींसह थायलंडला रवाना झाली आहे. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

हेही वाचा : आली लग्नघटिका समीप! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा पार पडला मेहंदी सोहळा; होणाऱ्या बायकोने शेअर केले फोटो

हेमलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या बॅचलर पार्टीची झलक शेअर केली आहे. पहिले काही फोटो आणि व्हिडीओमध्ये तिचा एअरपोर्ट लूक पाहायला मिळत आहे. यानंतर थायलंडमध्ये पोहोचल्यावर तेथील सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यांची झलक हेमलने तिच्या पोस्टमधून दाखवली आहे. तसेच आणखी एका स्टोरीजमध्ये हेमलने पार्टीसाठी सुंदर असा जांभळ्या रंगाचा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे.

आता हेमलच्या लग्नाची उत्सुकता तिच्या सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. नुकतीच ती ‘नवरा माझा नवसाचा २’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने सुप्रिया व सचिन पिळगांवकरांच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

हेही वाचा : ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! ‘लक्ष्मी निवास’ची संपूर्ण स्टारकास्ट आली समोर…

Marathi Actress Hemal Ingle Bachelor Party
हेमल इंगळेची बॅचलर पार्टी ( Marathi Actress Hemal Ingle Bachelor Party )

दरम्यान, हेमलने मराठी मनोरंजनविश्वात तिच्या करिअरची सुरुवात ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामधून केली. यामुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने अमरजा हे प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात हेमलसह अभिनय बेर्डे झळकला होता.

Story img Loader