मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी-धुमाळला ओळखले जाते. हेमांगी कवीने नुकताच तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने तिच्या चाहत्यांचे आभार व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने चाहत्यांची माफीदेखील मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील आघाडीची आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. नुकतंच हेमांगीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “आमचं सर्व मार्गी लागल्यावर…” सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं आईचं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाला “तिला कितीही वेळ…”

हेमांगी कवीची पोस्ट

“काल तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी msgs, phone calls, Dms केले त्यासाठी मी तुमचे आभार मानते. काहींचे calls मी घेऊ शकले नसेन, msgs वाचू शकले नसेन, reply देऊ शकले नसेन, tags पाहू शकले नसेन, stories remention करू शकले नसेन तर मोठ्या दिलानं तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा करते.

कालचा दिवस खरंच तुमच्या शुभेच्छांमुळे खास बनला. असंच प्रेम करत रहा, आशीर्वाद देत रहा! पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद!

त. टी.: वाढदिवस काल म्हणजे २६ ॲागस्टला होता, आज नाही याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मासिक पाळी असताना देवळात…”, हेमांगी कवीने शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “विज्ञानाची माती…”

हेमांगीच्या या पोस्टमध्ये तिने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाचा वनपीस परिधान केला आहे. त्याबरोबरच तिने केसात गजरा आणि पायात पैंजण घालत इंडो-वेस्टर्न लूक केला आहे. तिच्या या लूकवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.