मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती वकिलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच तिने या मालिकेच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या पात्राबद्दल आणि भूमिकेबद्दल सांगितले आहे. तसेच तिने तिच्यासाठी ही भूमिका का खास आहे, याबद्दलही तिने भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

हेमांगी कवीची पोस्ट

See you in Court!
माझे बाबा एलएलबी(वकिल) होते पण घरच्या परिस्तिथीमुळे practice न करता त्यांना नोकरी धरावी लागली. पण त्यांचा हा वकिलीचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आणला किंवा असं म्हणूया तो नकळतपणे येत होता. कंपनीच्या संपाच्या वेळेस, कंपनीच्या Union मध्ये, कधी कधी तर वैयक्तिक समस्या घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे कायदेशीर सल्ले मागायला यायचे आणि माझे ‘पप्पा’ जणू त्यांच्याकडे आलेल्या एखाद्या professional case सारखी त्यांच्या मित्रांना, कामगारांना, ओळखीच्या लोकांना विना मुल्य मदत करायचे.

त्यावर माझी ‘मम्मी’ typical बायको सारखी कायम बोलायची, “या मदतीचे किमान पैसे तरी घ्या, का उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” त्यावर ते वकिली उत्तर देत म्हणायचे “वकिलीची शपथ घेतली नाही तर मी कुणाकडून पैसे कसे घेणार? मी जर असे पैसे घेतले तर माझ्यावरच केस होईल. नाही का?” त्यावर बिच्चारी माझी मम्मी case मध्ये हरलेल्या client सारखी गप्प व्हायची. आम्ही भावंडं भांडायला लागलो की माझं मुद्देसुद बोलणं ऐकून माझी आई नेहमी म्हणायची rather अजूनही म्हणते वकिलाची मुलगी शोभतेस खरी!

सध्या मी STAR Pravah च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारतेय. माझ्या बाबांनी कधीच आमच्यावर त्यांचा वकिलीचा वारसा जपण्याची इच्छा लादली नाही! उलट आम्हांला जे आवडेल, झेपेल तेच शिकू दिलं! आवडतं क्षेत्र निवडू दिलं! पण आज मला असं वकिलाच्या Band आणि Gown मध्ये पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला असता हे नक्की! माझ्या Acting Career चा महत्त्वाचा खांब असणाऱ्या माझ्या ‘पप्पांना’ माझ्या सर्व भूमिका समर्पित आहेतच पण Advocate Gayatri Vartak ही भूमिका खास तुमच्यासाठी पप्पा!, असे हेमांगीने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची झलक समोर; शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी दिसणार ‘या’ खास भूमिकेत

दरम्यान हेमांगी कवी ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती अॅड. गायत्री वर्तक ही भूमिका साकारत आहे. याआधी ती ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत झळकली होती. यात ती महत्वाच्या भूमिकेत होती.

Story img Loader