मराठी सिनेसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत हेमांगीने काम केलं. हेमांगी लवकरच एका लोकप्रिय हिंदी मालिकेत झळकणार आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे या हिंदी मालिकेचे नाव आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवी ही इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असते. नुकतंच हेमांगीने तिच्या नव्या हिंदी मालिकेच्या भूमिकेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तिने सुंदर साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : बिग बींबरोबर जाहिरातीत झळकल्यानंतर हेमांगी कवीची हिंदी मालिकेत वर्णी, प्रोमो आला समोर

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

हेमांगी कवीची पोस्ट

“आजपासून येतेय तुमच्या भेटीला! एक नवी भूमिका घेऊन! भवानी चिटणीस म्हणून! रोज रात्री १० वा; फक्त @zeetv आणि @zee5 वर. ‘कैसै मुझे तुम मिल गए’ मालिकेमध्ये!

हिंदी मालिकेमध्ये मराठी पार्श्वभूमी असलेलं पात्र साकारताना अतिशय आनंद होत आहे. मालिकेच्या निर्मात्या मुक्ता धोंड मराठीच असल्यामुळे आपसुक एक आपलेपणा आणि तितकाच मोकळेपणा अनूभवायला मिळतोय! हाच आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आणि तुमचं १००% मनोरंजन करता यावं हे बळ आम्हांला मिळो हीच ईच्छा! आतापर्यंत जसं प्रेम, आशीर्वाद देत आलात यापुढेही देत रहा ही विनंती!”, असे कॅप्शन हेमांगी कवीने दिले आहे.

दरम्यान हेमांगी कवी ही ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या मालिकेत झळकणार आहे. ही मालिका येत्या २७ नोव्हेंबरपासून झी टीव्ही वाहिनीवर रात्री १० वाजता प्रक्षेपित होणार आहे. यात ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे.

आणखी वाचा : “…आणि हे मराठी कलाकार”, टीका करणाऱ्याला हेमांगी कवीचं रोखठोक उत्तर; म्हणाली, “किती नकारात्मक…”

हेमांगी कवीने याआधी अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. हेमांगी ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली. त्याबरोबरच ती अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ताली वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली.

Story img Loader