मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी धुमाळला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या सहकलाकारांबद्दल विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतचं हेमांगी कवीने तिच्या अभिनेता कुशल बद्रिकेबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेमांगी कवी ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा त्यावर विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतंच तिने कुशल बद्रिकेचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत कुशल हा गिटार वाजवताना दिसत आहे. तर इतर दोन फोटोत ते दोघेही मनसोक्त हसताना दिसत आहे. याबरोबर तिने त्याला कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

chhaava movie marathi writer kshitij patwardhan writes aaya re toofan song
मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ सिनेमाचं गाणं! ए आर रेहमानसह पहिल्यांदाच एकत्र काम; म्हणाला, “शब्दरूपी सेवा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Viral Video Shows Aunt and nephew Beautiful moment
नाते मावशी-भाच्याचे… चंद्रा गाण्यावर ‘तिला’ नाचताना पाहून बॉडीगार्डसारखा राहिला उभा; पाहा चिमुकल्याचा VIDEO
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट

“मेरे घर आया एक ‘नन्हा परा’!!! माझी ही शाब्दिक कोट्यांची नॉनसेन्सगिरी जगात कुणाला कळली असेल तर हा माणूस आणि म्हणूनच त्याने ती ‘ए ए वेडा बाई’ म्हणत फु बाई फु मध्ये उचलून धरली होती. वर्क झाली होती. आज ही आमच्या जोडीला मिस केलं जातं ही त्याचीच पावती आणि तसंही हा नन्हा पराच आहे कारण हा सतत म्हणत असतो ना आपल्या आत एक लहान मुल दडलेलं असतं वगैरे… याच्या बाबतीत ते लहान मुल फक्त आत नाही तर बाहेरही बागडतय… फक्त त्याला हे माहीत नाही एवढंच आणि कधी माहीत ही होऊ नये हीच इच्छा!

मित्र- मैत्रिणी, यार, फ्रेंडस बरेच असतात पण ‘दोस्त’ या शब्दाचा खरा अर्थ जगणारा एक नन्हासा, प्यारासा अलफिलटर दोस्त! कुशल बद्रिके ऐसेही रह मेरे पगले! काम तर वाजवतोसच तू.. वाद्य ही वाजवत रहा ( खुप छान गिटार वाजवली काल त्याने), छान छान लिहीत रहा, भारी भारी सुचत राहो तुला!

दोस्त येती घरा तोची दिवाळी दसरा!
त. टी. : आज काय त्याचा birthday वगैरे नाहीए याची मंडळाने नोंद घ्यावी. मला वाटलं लिहावंसं त्याच्या विषयी… लिहीलं!”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान हेमांगीची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करतानाही दिसत आहेत. ती सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.

Story img Loader