मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. नाटक, मालिका, चित्रपट आणि ओटीटी यांसारख्या सर्वच माध्यमातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतंच तिच्या एका स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काही माणसांच्या सवयीबद्दल लिहिण्यात आले आहे. काही माणसं हे चॅट्स पाहतात आणि त्यावर उत्तर द्यायलाच विसरतात, असे यात म्हटले आहे.
आणखी वाचा : चैतूची खऱ्या आईशी झालेली भेट, चिमीशी होणारी मैत्री आणि मोठा ट्वीस्ट; ‘नाळ २’ चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

त्यावर हेमांगी कवीने तिच्यात ही वाईट सवय असल्याचे सांगितले आहे. मला माफ करा, पण मी देखील यातील काही माणसांपैकी एक आहे, असे हेमांगी कवी म्हणाली.

हेमांगी कवीची पोस्ट

आणखी वाचा : “मी कधीही आरशासमोर…”, वजन कमी करण्यापूर्वी ‘अशी’ होती आरती सोळंकीची लाईफस्टाईल, म्हणाली “आता ड्रेस…”

दरम्यान हेमांगी कवीने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. एका जाहिरातीच्या निमित्ताने तिला ही संधी मिळाली आहे. त्याबरोबरच ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती वकिलाची भूमिका साकारत आहे. अॅड. गायत्री वर्तक असे तिच्या मालिकेच्या पात्राचे नाव आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi share instagram post talk about her habit nrp