मराठीतील आघाडीची आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. ती सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. नुकतंच हेमांगी कवीने तिच्या आई-वडिलांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगी कवीने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आई-वडिलांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचे आई-वडील, मोठा भाऊ आणि मोठी बहिणी पाहायला मिळत आहे. पण ती यात दिसत नाही. तिने याबद्दल तिची एक आठवणही शेअर केली आहे.
आणखी वाचा : ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये हेमांगी कवीला वकिलाच्या भूमिकेत पाहून आईची प्रतिक्रिया, म्हणाली “तू…”
हेमांगी कवीची पोस्ट
“हा आमचा Family photo!
माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी!
पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photo त.
लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले photos/ album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं! आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!
मी पण या सगळ्याला अपवाद नाही. मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई?
माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे!
तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो?”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.
आणखी वाचा : “प्रेक्षकांना ३०० रुपयात वरुण धवन दिसतोय, तर माझा चित्रपट का पाहतील?” शशांक केतकर स्पष्टच बोलला
दरम्यान सध्या हेमांगी कवी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती वकिलाची भूमिका साकारत आहे. अॅड. गायत्री वर्तक असे तिच्या मालिकेच्या पात्राचे नाव आहे. याआधी ती ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत झळकली होती. यात ती महत्वाच्या भूमिकेत होती.