संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली भारताची अतिमहत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान ३ यशस्वी झाली आहे. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर सॉफ्ट लँडिंग केलं आणि नवा इतिहास रचला. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. यानंतर आता जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं आहे. नुकतंच मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमांगी कवी सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सध्या हेमांगी कवी ही ‘जन्मवारी’ या नाटकांमध्ये व्यस्त आहे. त्यात ती मंजिरी हे पात्र साकारत आहे. नुकतंच हेमांगीने चांद्रयानाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Chandrayaan 3 : ‘India on the Moon’, मराठीसह हिंदी कलाकारांनी केलं इस्रोचं कौतुक, म्हणाले…

हेमांगी कवीची पोस्ट

“काल जन्मवारीचा प्रयोग होता दु. ४.३० वा. चा आणि बरोबर ६ वा. नाटकाचा मध्यंतर झाला! आम्ही सगळ्यांनी आपआपले mobile काढले, ‘चांद्रयान’ live प्रेक्षपण लावलं. ४०-४१ दिवसांपासून ज्या क्षणाची आपण सर्वच वाट पाहत होतो तो क्षण असा असेल याची आम्ही कुणीच कल्पना केली नव्हती. जसं ते यान चंद्रावर व्यवस्थित land झालं तसं आमच्या तोंडून “भारत माता की जय” ची जोरदार घोषणा झाली. आहाहा काय तो क्षण!

आपल्या ISRO ने संपूर्ण जगाला दिलेल्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद भारतीय म्हणून आम्ही नाट्यगृहाच्या green room मध्ये लुटला आणि त्याच जोशात नाटकाचा उत्तरार्ध सुरू केला! प्रयोग संपल्यावर नाटकातल्या एक दोन कलाकारांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या cake सोबत ISRO चं, ‘चांद्रयान’ चं यश ही आम्ही साजरं केलं!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “आमचं सर्व मार्गी लागल्यावर…” सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं आईचं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाला “तिला कितीही वेळ…”

दरम्यान ‘चांद्रयान ३’ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं आहे. १४ दिवसांसाठी ही मोहीम चालणार आहे. रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi share post on chandrayaan 3 landing watch during drama nrp
Show comments