सध्या सगळीकडे दिवाळीची धूमधाम बघायला मिळत आहे. सामान्य माणसांपासून कलाकारापर्यंत प्रत्येकजण मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करत आहे. दिवाळी म्हणलं की आकाशकंदिल फटाके आलेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आकाशकंदीलच मोठं आकर्षण असतं. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक आकाशकंदिलमधून एक आकाशकंदिल निवडणं म्हणजे अवघडच गोष्ट असते. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने आकाशकंदिलशी निगडीत दिवाळीची आठवण सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : रस्त्यावरच्या म्हाताऱ्या आजीकडून मराठी अभिनेत्रीने विकत घेतल्या पणत्या, व्हिडीओ पाहून सर्वत्र होतंय कौतुक

हेमांगी कवीने पोस्टमध्ये लिहिलं दरवर्षी प्रमाणे यंदाही! मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच.

हेही वाचा- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याने खरेदी केलं नवीन घर, पोस्ट शेअर करत म्हणाला…

हेमांगीने पुढे लिहिलं खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून! प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना special च असतो! पण मग इतक्या सर्व options मधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कटीन! म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं is altogether different game भाई. कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी! तुम्ही करता का असं?

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट, मालिका नाटकांच्या माध्यमातून तिने आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने अॅड. गायत्री वर्तक हे पात्र साकारलं आहे. तसेच लवकरच ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीतही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच हेमांगीने या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे पोस्टर शेअर केले होते.