अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ ही अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. ती नेहमी बिनधास्तपणे स्वत:चे मत मांडताना दिसते. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच हेमांगीने तिच्या पतीबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमांगीनी तिच्या इन्स्टाग्रामला तिचे पती संदीप धुमाळ एक फोटो शेअर केला आहे. यात तिचे पती देखील मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. ते डिओपी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी हिंदी चित्रपटांसाठी काम केलं आहे. तिने नुकतंच याबद्दल एक पोस्ट केली आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

हेमांगी कवीची पोस्ट

“यहां कौन विक्रम कौन वेधा?
मला वाटतं Dop (director of photography), cinematographer, छायाचित्रकार आणि Camera चं नातं विक्रम वेताळासारखं आहे. कधी dop कॅमेऱ्याच्या मानगुटीवर तर कधी camera, dop च्या!
कोण कुणाला स्टोऱ्या सांगत असतं कुणास ठाऊक? आपण मात्र यांच्या स्टोऱ्यांमध्ये गुरफटून प्रश्न उत्तराचा खेळ खेळू लागतो. कधी कधी उत्तर बरोबर असतं तर कधी चूक. कधी उत्तर मिळतं तर कधी कधी हे शहाणे आपल्यालाच निरुत्तर करून जातात किंवा नवीन प्रश्नांना जन्म घालून जातात.
Camera शिवाय dop नाही, dop शिवाय camera नाही! Director, writer, actor ला स्वतःच्या स्टोऱ्या सांगायला अनेक माध्यमं आहेत पण Dop ला? गम्मत आहे नाही सगळी!”, असे हेमांगीने यात म्हटले.

आणखी वाचा : “आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल

दरम्यान हेमांगीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ‘काय भारी लिहिलंय’, ‘लेखन व शोध उत्तम….’ अशा अनेक कमेंट तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. ती अनेकदा तिच्या पतीबद्दल पोस्ट शेअर करत असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi share special post for husband sandeep dhumal nrp