मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी-धुमाळला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हेमांगीला तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी हेमांगीने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती. आता तिने ही पोस्ट करण्यामागचे कारण सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमांगी कवी नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी तिला तू ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट का टाकली, त्यामागे नेमकं कारण काय होतं? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “माझ्या मोठ्या बहिणीसाठी प्रार्थना करा”, भावाच्या निधनानंतर अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, म्हणाली “माझे जग उद्ध्वस्त…”

“मी एक व्हिडीओ टाकला होता, ज्यात मी चपात्या करत होते. त्या व्हिडीओवर एका बाईने कमेंट केली होती. ज्यात तिने मला ‘बाई तुला कळत नाही का, की तू पोळ्या लाटतेस… पण त्यात ते दिसतंय वैगरे…’ असं तिने बरंच काय काय म्हटलं होतं. त्यावेळी माझं असं झालं की, “तू स्वत: एक बाई आहेस, तुला स्वत:ला या गोष्टींचा त्रास होतो आणि तू मला अक्कल शिकवतेस.” त्यावर त्या बाईने “तुला पोस्ट करायच्या आधी ते कळायला हवं”, असं म्हटलं. तर तेव्हा मी म्हटलं, “मी माझ्या घरात आहे.” त्यावर तिने तू घरात असलीस तरी तुला याचं भान ठेवायला हवं, असे म्हटले.

जेव्हा एखादा पुरुष पांढऱ्या रंगाचे कपडे घालून भिजतो, त्यावेळी तो बघतो का की माझं काही दिसतंय का, तो पोस्ट करुन मोकळा होतो ना… त्यावर त्या बाईने नाही नाही, तो पुरुष आहे. त्यावर मी हाच माझा मुद्दा आहे, असं म्हणतं तिला फटकारलं.

“मला जसं जगायचं, तसं जगू द्या, तुम्हाला माझ्याबद्दल काय ठरवायचं ते ठरवा, पण हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण तुला अक्कल नाही, तुझ्यावर संस्कार नाही. तुझं शिक्षण नाही” या एका गोष्टीमुळे बोल लावू नका.

आपण मुलांच्या सर्व गोष्टींवर दुर्लक्ष करतो, पण मुलींच्या गोष्टींवर का केलं जात नाही. तेव्हा मला या गोष्टी जाणवल्या. पुरुष हा संस्कृतीकारक आहे, बायका या संस्कृती वाहक आहेत. बायका या संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आपण पुरुषप्रधान संस्कृती असे म्हणतोय, पण मग आता फिल्टर लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही टाकताय म्हणून आम्ही गप-गुमान ऐकणार नाही. त्यामुळे मी ती पोस्ट केली होती”, असे हेमांगीने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”

दरम्यान हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत होती. त्याबरोबरच ती ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातही झळकली होती. तसेच तिने अनेक नाटकांमध्येही काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi share the real reason behind bai boobs and bra social media bold post nrp