बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आज जयंती. देव आनंद यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. त्यांच्या जयंतीचं निमित्त साधत प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने एक खास पोस्ट केली आहे.

हेमांगी कवी ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. नुकतंच हेमांगीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोला कॅप्शन देताना तिने अभिनेते देव आनंद आणि तिचे आई वडील यांची एक आठवण सांगितली आहे.
आणखी वाचा : “तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…”

हेमांगी कवीची पोस्ट

“काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday!
माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे!
माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते. Happy Birthday देव साहब!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : निवेदिता सराफ यांच्या भाचीने विमान प्रवासावेळी मराठीत दिल्या सूचना, व्हिडीओ पाहताच प्राजक्ता माळी, सुकन्या मोने म्हणाल्या…

दरम्यान हेमांगी कवी सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकत आहे. यात ती वकिलाची भूमिका साकारत आहे. अॅड. गायत्री वर्तक असे तिच्या मालिकेच्या पात्राचे नाव आहे. याआधी ती ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत झळकली होती.

Story img Loader