मराठीतील आघाडीची आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. ती सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. हेमांगी कवी सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. नुकतंच हेमांगी कवीने मासिक पाळी आणि देवळात जाण्यास केली जाणारी बंदी यावर तिचे मत मांडले आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

हेमांगी कवीने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेली ही पोस्ट मैत्रियी बांदेकर या तरुणीची आहे. मैत्रियीने या पोस्टमध्ये मासिक पाळी आणि देवळात जाण्याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “मी त्या संधीला मुकले असं वाटत असताना…” सचिन तेंडुलकरने ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर दीपा परबला केला व्हिडीओ कॉल, पोस्ट चर्चेत

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!

हेमांगीने शेअर केलेली पोस्ट

“आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला…
स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ‘ वैज्ञानिक कारणं ‘ सांगणारा…
का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! I mean, हद होती है यार!
म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास १ मिलियन लाईक्स!

आणखी अलार्मिंग गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर, रिल पाठवणारी सोबत अजून बऱ्याच जणी होत्या, सगळ्या मुलीच! एक आत्ता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक microbiology मधे मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेक च्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सिनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत?

बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नको जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका ना किमान! तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा, मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं validation कशाला हवं? समाजाचं आहे की! “याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणी पासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही” हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही!

कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना human reproduction, menstrual cycle च्या मागचं विज्ञान शिकवता येतंय, किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं… मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो! आता फक्त खिन्न वाटतंय… यातून कुणीच वाचणार नाही… विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे, अगदी शेवटापर्यंत, या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!”, असे मैत्रियीने म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : ठाण्यातील मॉलमध्ये लहान मुलाचा शिवघोष ऐकून चिन्मय मांडलेकरने केलं असं काही…; व्हिडीओ व्हायरल

हेमांगीने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याला कॅप्शन देताना तिने “खूप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!” असे म्हटले आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Story img Loader