महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावरील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित केले होते. मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या पतीसह वर्षावरील गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी विराजमान झालेल्या गणपतीची झलक दाखवली आहे. याला कॅप्शन देताना तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : “यावर्षीचे देखावे…” पुण्यातील गणपती दर्शनानंतर प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या “तो योग आज…”

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
eknath shinde challenge to mahavikas aghadi,
“तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!

हेमांगी कवीची पोस्ट

“जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं! महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता जो कायम स्मरणात राहील!

एवढंच नाही तर सौ. लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता Security reasons मुळे काही गोष्टी नाही share करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं! @mangeshdesaiofficial तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद. यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली!

खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो! घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्यामंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा Files वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं. मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं “गणपतीच्या एवढ्या सगळ्या गडबडीत आणि तेही एवढ्या late कसल्या सह्या चालंल्यात? तर म्हणाला “उद्याच्या सार्वजनिक सुट्टीबद्दल असू शकतं काहीतरी.” मी पुढे म्हटलं “राज्याच्या कारभारासोबत गेल्या दहा दिवसांतला गोतावळा सांभाळायचा, लाखो लोकांना personally भेटायचं, त्यांचं स्वागत करायचं, विचारपुस करायची, बरं तिथं गेलेल्या प्रत्येकाला वाटतं त्यांच्या बरोबर photo हवाच त्यासाठी कुणालाही नाराज न करता, protocols सांभाळत लाखो photos साठी उभं राहयचं. उत्सहाच्या भरात मी पण त्यांना photo साठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईट ही वाटलं! म्हटलं “अशाने यांना थकायला होत नसेल का?” तर तो म्हणाला “इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!”

मी मनात म्हटलं “गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देओ आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!” खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!”, असे कॅप्शन हेमांगी कवीने दिले आहे.

दरम्यान हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर हार्ट, हात जोडताना आणि टाळ्या वाजवतानाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं आहे.