‘झी मराठी’वरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे अभिनेत्री ईशा केसकर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिनं बानू ही भूमिका साकारली होती; जी चांगलीच गाजली होती. या भूमिकेमुळे तिनं प्रेक्षकांची अल्पवधीतच मनं जिंकली होती. त्यानंतर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया या भूमिकेत झळकली. ईशाने फक्त मालिका नाही तर चित्रपटातही काम केलं आहे. आता लवकरच ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “मी सात महिने घरी बसलेलो, कारण सुबोध भावे…”, चिन्मय मांडलेकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…

‘स्टार प्रवाह’वरील काही लोकप्रिय मालिका बंद झाल्या असून त्या जागी नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांच्या निरोप घेतला. त्यानंतर तब्बल चार प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका बंद झाली. या मालिकेच्या जागी अभिनेत्री तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. अशातच आता ईशा केसकरची देखील ‘स्टार प्रवाह’वर एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोक सराफ झाले भावुक; नक्की काय घडलं? पाहा

हेही वाचा – “…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा

काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह परिवार’ या इन्स्टाग्राम पेजवर ईशा केसकरची एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये लवकरच ईशा केसकर स्टार प्रवाहवर एक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असं लिहिण्यात आलं होतं. पण कोणत्या मालिकेत, कोणत्या भूमिकेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आता एकाबाजूला ईशाची ‘स्टार प्रवाह’वरील कुठल्यातरी मालिकेत एन्ट्री होणार यांची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा गश्मीर महाजनी आहे क्रश; म्हणाली…

तसेच लवकरच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३’ सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’वरील कलाकार मंडळी नृत्य सादर करणार आहेत. यामध्ये ईशा देखील पाहायला मिळणार आहे. या सोहळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ईशा अभिनेता अक्षर कोठारीबरोबर बाप्पाची आरती करताना दिसली आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्याबाजूला या दोघांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण याबाबत नेमकं सत्य हे येत्या काळात समजेल.

Story img Loader