मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहोचली. या मालिकेत जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबर जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

सोशल मीडियावर जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता जुईच्या नव्या व्हिडीओच सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर जुईने एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका लहान मुलीला खेळवताना दिसत आहे. ही लहान मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून तिची भाची आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर
devmanus Fame Kiran Gaikwad share reel video with future wife Vaishnavi kalyankar
Video: जगणं हे न्यारं झालं जी…; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने पहिल्यांदाच होणाऱ्या पत्नीसह Reel व्हिडीओ केला शेअर, पाहा
Lakshmi Niwas Fame Meenakshi Rathod Daughter Yara sing Majha Bhimraya song
Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
sunny leone did pooja with children 1
सनी लिओनीने केली नव्या वास्तूची पूजा, मुलांसह म्हटले मंत्र; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ती त्यांना संस्कृती…”

हेही वाचा- मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेत न्यूझीलंडला जात लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने मिळवलं मोठं यश, म्हणाली…

जुईने हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “मावशी ड्युटी! दत्तजयंतीला घरी भजन सुरू असताना आमच्या ‘प्रचिती’ असं फिरायचं होतं. गंमत म्हणजे ती भजन सुरू असताना एकदाही रडली नाही. ती छान रमली होती. तेवढाच आमच्या सखीला free time मिळाला! पण माझा वेळ पिल्लाबरोबर खूप छान गेला.” जुईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे.

जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली कल्याणी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तसेच श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझविन सख्या रे या मालिकांमधील जुईची भूमिका चांगलीच गाजली. मालिकांव्यतरिक्त जुईने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे.

Story img Loader