अभिनेत्री जुई गडकरी ही कायमच चर्चेत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. जुईने या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. नुकतंच तिने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे १०० भाग नुकतंच पूर्ण झालं आहे. त्या निमित्ताने तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबद्दल त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे.

जुई गडकरीची पोस्ट

“आज आमच्या “ठरलं तर मग” चे १०० भाग पुर्ण होत आहेत!!!
तो पहिला कॉल आज खुप आठवतोय!! त्या एका कॅाल ने माझं लाईफ चेंज केलं!!! गेल्या जुलैला मी सोहम प्रॅाडक्शन्स चा भाग झाले!! आणि आज माझी ही फॅमिली १०० भागांची झाली!!! मी आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुई ला “सायली” दिली!!!
हि मालिका माझ्यासाठी खुप जास्तं “close to my heart” आहे!! कारण एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना या मालिकेने मला आपलंसं केलं! आणि मी आज एक पुर्ण वेगळं लाईफ अनुभवतेय!! या सेट ची, crew ची Positivity ईतकी आहे की मला परत मागे वळुन बघायचंच नाहिये!! मी फक्तं त्रुणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.. मला नेहेमी confidence दिला की मी करु शकेन!
तुमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहेमी पाठीशी असुद्या. त्यातुनच मला ताकद मिळते रोज जोमाने काम करायची.
जय गुरुदेव दत्त”, अशी पोस्ट जुई गडकरीने केली आहे.

दरम्यान जुई गडकरीने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेत तिने कल्याणी हे पात्र साकारलं होतं. या पात्रामुळेच तिला घराघरात ओळख मिळाली. ‘पुढचं पाऊल’नंतर जुई ही ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’, ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘आता ठरलं तर मग’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेत सध्या अनेक उत्कंठावर्धक वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress jui gadkari suffer rheumatoid arthritis illness after tharla tar mag 100 episode complete nrp