‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावर एका डंपरने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. तिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. कल्याणी कुरळेच्या निधनाचे वृत्त ऐकताच ‘तुझ्यात जीव रंगला’मालिकेतील कलाकारांना धक्काच बसला आहे. नुकतंच या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत कल्याणीने भूमिका साकारली होती. यात तिने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. मात्र तिच्या या छोट्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं होतं. या मालिकेमुळे कल्याणी घराघरात पोहोचली. कल्याणीच्या अचानक झालेल्या निधनामुळे या मालिकेतील कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकरने नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती.
आणखी वाचा : “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

या मालिकेत नंदिता गायकवाड आणि कल्याणी कुरळे या दोघीही एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र खऱ्या आयुष्यात त्या दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. कल्याणीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिने त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यावेळी धनश्रीनं तिच्या भावना व्यक्त केल्या.

कल्याणीने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. यात तिने “नाही असं जायला हवं होतंस गं….जीवाला हुरहूर लावून गेल्यास बग…” असं धनश्रीनं म्हटलं आहे. दरम्यान तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला ट्रॅक्टरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

आणखी वाचा : नवं हॉटेल, आठवड्यापूर्वी वाढदिवस अन् ट्रॅक्टरची धडक; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल? व्हिडीओ चर्चेत

कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रकाशझोतात आली होती. तिने सन मराठी या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती. कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात राहत होती. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kalyani kurale died actress dhanashri kadgaonkar share instagram story nrp