छोट्या पडद्यावरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून कल्याणी चौधरी सोनोनेला ओळखले जाते. या मालिकेत तिने ‘पुष्पा’ हे पात्र साकारले होते. नुकतंच नवरात्रीच्या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका संकटाबद्दल भाष्य केले.

कल्याणी नंदकिशोर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. कल्याणीने नवरात्रीचे औचित्य साधत समाजातील प्रतिष्ठित महिलांना सन्मान देऊन त्यांच्याबद्दल भाष्य केले आहे. त्याबरोबरच तिने तिच्या आयुष्यात आलेल्या एका कठीण प्रसंगाबद्दलही सांगितले.
आणखी वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य

कल्याणी नंदकिशोर यांची पोस्ट

मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच झी मराठी वरील “लागिरं झालं जी” मधली आज्या ची मामी, “मन झालं बाजिंदं”. मधली गुली मावशी, कलर्स मराठी वरील “राजा राणी ची गं जोडी” मधली पंजाबराव ची बायको कल्याणीबाई, सन मराठी वरील “शाब्बास सूनबाई” मधली ईश्वरी.

२७ नोव्हेंबर २०१४ ला खुशी चा जन्म झाला आणि साधारण १५ दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत हे त्या तपासण्या मधुन समजलं.

अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना या प्रकारे आहे की तिला भूल देणं सुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल.

आज खुशी १० वर्षांची झाली आहे. या १० वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलेली आहे आणि पुढे सुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे.

आजचा रंग निळा. निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत, असे कल्याणी नंदकिशोर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : सुयश टिळक झळकणार नव्या मालिकेत, पहिला लूक आला समोर

दरम्यान कल्याणी नंदकिशोर यांनी ‘लागिर झालं जी’ या मालिकेत ‘पुष्पा’ हे पात्र साकारले होते. त्याबरोबरच ती ‘मन झालं बाजिंद’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘शाब्बास सूनबाई’ यासारख्या मालिकेतही झळकली. तसेच कल्याणी लवकरच ‘खुर्ची’ या चित्रपटातही झळकणार आहे.