सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता केतकीने गुरूपौर्णिमेनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

केतकी चितळे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने गुरूपौर्णिमेनिमित्त तिच्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत. त्याबरोबर तिने तिच्या पंजीबद्दल आणि आजारपणाबद्दलही सांगितले आहे.
आणखी वाचा : Video : साईशा भोईरचा ‘नवा गडी नवा राज्य’ मालिकेला रामराम, ‘ही’ बालकलाकार झळकणार ‘चिंगी’च्या भूमिकेत, प्रोमो समोर

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

केतकी चितळेची पोस्ट

“प्राथमिक गुरू नेहमी आपले आई वडील असतात. मूल कळत नकळत नेहमीच मोठ्यांचे वागणे पाहत असतं आणि ते मोठ्यांचे वागणे कुठेतरी मनात छापून राहते. माझे लहानपण चित्रपटातील मुलांसारखे किंवा माझ्या वर्गातील इतर मुलांसारखे गेले नाही.
प्रचंड विचित्र परिस्थितीत माझ्या बाबानी दाखवलेला संयम, व आईची खंबीर भूमिका, वयाच्या चौथ्या वर्षी पहिल्यांदा (माझ्या आठवणीत, अर्थात) छाप पाडून गेली. पुढे मुंबईत बॉम्ब स्फोट व दंगली झाल्या. तेव्हा आमचे घर विविध दुकानांचे गोडाऊन झाले कारण शिवाजी पार्क एपिसेंटर होते जवळपास. तेव्हा शिकले की कठीण समय येता नाव फक्त श्रीहरीचे घेऊन फायदा नसतो तर स्वतः श्रीहरी बनायचे असते.

मग एपिलेप्सी डायग्नोस झाली आणि आई बाबाची एपिलेप्सी म्हणजे काय, हे शिकायची धडपड बघायला सुरुवात झाली. आपल्या मुलांकडून शिकावे यात त्यांना कधिच कमीपणा वाटला नाही. बऱ्याच गोष्टी ते आमच्याकडून शिकत असतात व दर गुरुपौर्णिमेला पहिला मेसेज नेहमी आईचा असतो: आशिर्वाद व नमस्कार.

पण ही शिकवण ते त्यांच्या पालकांकडून शिकले. वयाच्या ९९व्या वर्षी माझ्या आजोबांना इंसेप्शन हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला आणि बुद्धी बघा त्यांची किती शार्प की जे “I am a Nolan fan” म्हंणाऱ्या ५०% लोकांना कळले नाही ते त्यांनी डोक्यावर हात मारून एका वाक्यात म्हंटले, ‘स्वप्नातील स्वप्नातल्या स्वप्नात जे घडले त्यामुळे खऱ्या आयुष्यात हा माणूस पैसे देणार!’ हे वाक्य ही कळायला अवघड आहे बऱ्याच “मराठी अस्मिता” बाळगणाऱ्या युवकांना, कारण simple मराठी नाही.

लहानपणी माझी पणजी आमच्याकडे बऱ्याच वेळा यायची. ती इतकी स्ट्रॉंग बाई की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगवास तिने भोगला होता. तीने कहाण्या (किस्से) सांगताना शिकवले की कुठल्याही परिस्थितीत माणसाने जगायला शिकावे आणि जगणे म्हणजे फक्त जिवंत राहणे नव्हे तर दुसऱ्यांना मदत करणे.

एपिलेप्सीची ऋणी तर मी नेहमीच राहणार कारण एपिलेप्सी नसती तर केतकी चितळे एक किरकोळ सामान्य दादर शिवाजी पार्क, डोक्यावरून पाणी विले पारले मध्ये राहणारी दोन मुलांची आई जी आपण बरे, आपला परिवार बरा अशा विचारांची बाई असती. एपिलेप्सीने मला ताकद दिली लढायची, आपल्यावर हसणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर द्यायची. एपिलेप्सी आपला एक भाग आहे मग कुणाला अधिकार नाही त्यावर हसायचा हे मनात ठाम एपिलेप्सीने केले.

आज गुरुपौर्णिमा, सोशल मिडियावर फक्त या तिघांनाच साष्टांग नमस्कार.
“गुरू असतात अनेक, गुरू होतात अनेक,
गुरू वागतात अनेक; पण मान कमवतात क्वचितच”, असे केतकी चितळेने म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : खिमा पाव, काळं चिकन अन् बोंबील फ्राय; ‘बिग बॉस मराठी’तील अभिनेत्रींची खवय्येगिरी, म्हणाल्या “मांजरेकरांच्या हॉटेलची…”

दरम्यान केतकी चितळेच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. तर काहींनी तिला यावरुन ट्रोलही केले आहे. केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.