अभिनेत्री केतकी चितळे ही सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीत येताना दिसते. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. अर्थात तुम्ही झिंगाट पिढी असे या कवितेचे शीर्षक आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केतकीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केतकीने तिने ही कविता का रचली? याबद्दल सांगितले आहे. “मी केतकी चितळे, आज मी एक कविता पोस्ट केली आहे. आज मराठी दिन, महाराष्ट्र दिन किंवा मराठी भाषेविषयी कोणतंही खास निमित्त नाही. कोणताही कार्यक्रम, सणदेखील नाही. आज काहीही साजरं करण्यासाठी मी हे रचलेले नाही. यामागचे कारण म्हणजे एका व्यक्तीने मला इन्स्टाग्रामवर मेसेज करत दमलेल्या बापाची कहाणी अशा मथळ्याखाली मोठा मेसेज केला. त्यांनी मला या गाण्याचे काही लिरिक्स मेसेज केले. त्यावर त्यांनी मला हे नवीन असल्याचे सांगितलं.
आणखी वाचा : केतकी चितळेने हातावर गोंदलेल्या टॅटूचा संबंध थेट शरद पवारांशी, अर्थ सांगत म्हणाली “ते अंक म्हणजे…”

पण आजकालच्या पिढीला हे गाणं हल्लीच आलेलं आहे हे देखील माहिती नाही. हे वाचून मला फार विचित्र वाटलं. यावरुन मला ही कविता सुचली. मला जसे जसे शब्द सुचत गेले तसं तसं मी ते रचले”, असे तिने या व्हिडीओत म्हटलं आहे.

केतकी चितळेने शेअर केलेली कविता

“अर्थात तुम्ही झिंगाट पिढी,
अशुद्ध मराठी प्यारी.
भाषेविषयी अक्कल नाही,
पण फुकट, न कमवलेला अभिमान जोपासणारी.
अर्थात तुम्ही झिंगाट पिढी.

शुद्धलेखनाची बोंब तुमची,
मातृ-पितृ वाणी ही चुकीची.
पण मायबोलीचे ठेकेदार तुम्हीच,
जरी आनी-पानी-गोनी असली तुमची.
अर्थात तुम्ही झिंगाट पिढी.

कुणी वेगळी वाणी वापरलीच, तर
बलात्कार व मारून टाकायच्या धमक्या देणार.
रुबाब जणू, आविष्कार तुम्हीच केलात मराठीचा,
पण ना तुमचे प्रेम, ना आदर, ना ही सहयोग असे भाषाज्ञानी.
अर्थात तुम्ही झिंगाट पिढी.”

आणखी वाचा : “कालीमातेला दारुचा नैवेद्य असतो तर शंकराच्या मंदिरात…” केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान केतकी चितळेने शेअर केलेली ही कविता आणि पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने ही कविता करण्यामागचे कारणही यावेळी सांगितलं आहे. तसेच यावेळी तिने अनेक नेटकऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ketaki chitale share poem after fan forgotten the damlelya babachi kahani song lyrics get angry nrp