मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे आणि संग्राम साळवी. गेल्या वर्षी दोघं दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. खुशबूने २ ऑक्टोबर २०२४ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याआधी खुशबू आणि संग्रामला एक मुलगा आहे. त्याचं राघव नाव असून तो आता तीन वर्षांचा आहे. आज खुशबू आणि संग्रामच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने खुशबूने नुकतीच इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खुशबू तावडे आणि संग्राम साळवीने ५ मार्च २०१८मध्ये लग्नगाठ बांधली. मराठी रिती-रिवाजात, अत्यंत साध्या पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने खुशबूने संग्रामबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे. “सात वर्षे पूर्ण झाली आणि असे नेहमी कायम राहू,” असं कॅप्शन लिहित खुशबूने एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघं खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोच्या मागे अभिनेत्री ‘सपना जहाँ’ गाणं लावलं आहे. खुशबूच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच आता या पोस्टवर इतर कलाकारांमंडळींसह चाहत्यांनी खुशबू आणि संग्रामला लग्नाच्या सातव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खुशबू तावडे-संग्राम साळवीची पहिली भेट

खुशबू आणि संग्रामची पहिली भेट ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवर झाली नव्हती. याबाबत खुशबू एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. खुशबू म्हणाली होती, “जेव्हा माझी ई-टीव्हीवरची ‘एक मोहोर अबोल’ मालिका सुरू होती. तेव्हाच याची ‘देवयानी’ मालिका सुरू होती. दोन्ही मालिकेचं शूट गोरेगावमधल्या एकचा बिल्डिंगमध्ये होतं. तिथे याचं डे-नाईट सुरू असायचं आणि आमचं सात ते सात शूट सुरू असायचं. मी एकदा त्या सेटवर आले तेव्हा संग्राम बाहेर बसून ब्रश करत होता. तर मला असं झालं होतं, हे शूटिंगचं चाललंय ना? तिथे मला हा अजिबात आवडला नव्हता.”

दरम्यान, खुशबू तावडे आणि संग्राम साळवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, खुशबूने काही काळासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. ती शेवटची ‘झी मराठी’वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत झळकली होती. तसंच संग्राम ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली जयची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.