Khushboo Tawde Baby Girl Naming Ceremony : अभिनेत्री खुशबू तावडे २ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलीबरोबरचे फोटो शेअर करून नाव जाहीर केलं. ‘राही’ असं खुशबूच्या लेकीचं नाव आहे. नुकताच लेकीचा नामकरण सोहळा घरच्या घरीच साध्या पद्धतीने पार पडला. याचा व्हिडीओ खुशबूची बहीण, अभिनेत्री तितीक्षा तावडेने ( Titeekshaa Tawde ) शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री खुशबू तावडेचं डोहाळे जेवण देखील घरच्या घरी साध्या पद्धतीने केलं होतं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत खुशूबचं डोहाळे जेवण झालं होतं. पण, डोहाळे जेवणाला खुशबूचा पती, अभिनेता संग्राम साळवी ( Sangram Salvi ) शूटिंगच्या कारणास्तव उपस्थित नव्हता. परंतु, आता लेकीच्या नामकरण सोहळ्यात संग्राम पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video : “बिग बॉस मराठीमध्ये तुला काय झालेलं?” निखिल दामलेचा जबरदस्त डान्स पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले…

तितीक्षा तावडेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ती खुशबूला हळद-कंकू लावून ओटी भरताना दिसत आहे. त्यानंतर तितीक्षा पारंपरिक पद्धतीने भाचीला पाळण्यात घालताना पाहायला मिळत आहे. मग संग्राम आणि तितीक्षा नव्या पाहुणीचं नाव सर्वांसमोर जाहीर करताना दिसत आहेत. पारंपरिक आणि अत्यंत साधेपणाने खुशबू-संग्रामने लेकीचा केलेल्या नामकरण सोहळ्याने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

राहीच्या नामकरण सोहळ्याच्या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री मेघना एरंडे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, निखिल बने, मुग्धा गोडबोले-रानडे अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा देत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सुंदर नाव”, “अभिनंदन…खूप गोड नाव आहे”, “किती गोड”, “अभिनंदन संग्राम सर”, “ईश्वराची सदैव कृपा असो”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या सेटवर स्नेहल तरडे आणि हृषिकेश जोशी यांच्याबरोबर खेळला ‘हा’ खेळ, कोण जिंकलं पाहा…

राहीच्या नामकरण सोहळ्याचा पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणने केला पहिला Reel व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “भाऊ इज बॅक”

दरम्यान, खुशबू तावडेबद्दल बोलायचं झालं तर, डोंबिवलीत जन्म झालेल्या खुशबूने बीएससीमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘एक मोहोर अबोल’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘देवयानी’, ‘आम्ही दोघी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ अशा अनेक मराठी-हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका खुशबूने साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress khushboo tawde baby girl naming ceremony video viral pps