‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री खुशबू तावडे काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली. २ ऑक्टोबरला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी खुशबूची मैत्रीण अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे जाहीर केली होती. खुशबूबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, “मुलगी झाली…अभिनंदन.” त्यानंतर नुकतीच खुशबू तावडेने स्वतः पोस्ट करत लेकीचं नाव जाहीर केलं आहे.

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अभिनेत्री खुशबू तावडेने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चिमुकल्या लेकीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये खुशबू, पती संग्राम साळवी, राघव आणि नवीन पाहुणी दिसत आहे. पण, खुशबूने आपल्या चिमुकल्या लेकीचा चेहरा उघड केला नाही. तिच्या चेहऱ्यावर तिने इमोजी लावले आहेत.

Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

हेही वाचा – Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा घराबाहेर नाही तर गेला जेलमध्ये? दिला मोठा अधिकार

अभिनेत्रीने चिमुकल्या लेकीबरोबरचे दोन सुंदर फोटो शेअर करून नाव जाहीर केलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, राघवची लहान बहीण ‘राधी’ला भेटा. खुशबूच्या या सुंदर पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नींना हिंदी ‘बिग बॉस’साठी झाली होती विचारणा, नकार देण्याचं कारण देत म्हणाल्या…

खुशबू तावडेच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री पूजा बिरारी, अपूर्वा गोरे, सिद्धार्थ बोडके, मयुरी देशमुख, मेघना एरंडे, अमृता बने, पल्लवी वैद्य, भक्ती रत्नपारखी, रुतुजा धारप अशा अनेक कलाकारांनी खुशबू आणि संग्राम साळवीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा –‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा MMS झाला लीक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; उत्तर देत म्हणाली, “एन्जॉय”

दरम्यान, खुशबू तावडेबद्दल बोलायचं झालं तर, डोंबिवलीत जन्म झालेल्या खुशबूने बीएससीमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘एक मोहोर अबोल’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘देवयानी’, ‘आम्ही दोघी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ अशा अनेक मराठी-हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका खुशबूने साकारल्या आहेत. २०१८ साली खुशबूचं अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदा आई-बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव राघव असून तो आता ३ वर्षांचा आहे. 

Story img Loader