छोट्या पडद्यावरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील आनंदी, रमा, राघव सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यात अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर यांच्या उत्कृष्ट अभिनयाला प्रेक्षक कायमच दाद देत असतात. अभिनेत्री अनिता दातेच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री कीर्ती पेंढारकरने खास पोस्ट केली आहे.

अभिनेत्री कीर्ती पेंढारकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

कीर्ती पेंढारकरची पोस्ट

Happy Birthday अनिता, काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती कि ‘ती परत आलीये, आता मज्जा येणार’. तू परत आल्याने सिरीयल मध्ये तर मज्जा येतेच आहे पण तुझ्या बरोबर असल्याने, आम्हाला खूप मज्जा येतेय…

तुझा sense of humour कमाल आहे. तुझं कामावरचं असलेले प्रेम आणि त्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय सुद्धा तू अगदी विचारपूर्वक घेतेस. कायम अशीच राहा आणि दुसऱ्यांना हसवत राहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत, God bless u, असे कीर्ती पेंढारकरने म्हटले आहे.

दरम्यान अनिताने २००८ मध्ये ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘आजोबा’, ‘पोपट’, ‘सीमा’, ‘जोगवा’, ‘अडगुळ मडगुळ’ या चित्रपटात झळकली. झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत झळकत आहे.

Story img Loader