छोट्या पडद्यावरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून किर्ती पेंढारकरला ओळखले जाते. या मालिकेत किर्ती ही वर्षा हे पात्र साकारत आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच किर्तीने तिच्या बहिणीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री किर्ती पेंढारकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने तिच्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “मला सुशांतचा खूप राग आला होता…” अंकिता लोखंडने सांगितला ‘तो’ किस्सा म्हणाली “मी खूप पझेसिव्ह…”

किर्ती पेंढारकरची पोस्ट

“Late post, Belated Happy Birthday Tai
तू ताई असलीस, तरी तू आई सारखचं माझ्यावर प्रेम करतेस. माझ्या सगळ्या चुका तू कायम पोटात घालतेस. आपल्या दोन्ही मुलांनकडे तुझं व्यवस्थित लक्ष असतं आणि त्यांच्या बाबतीतल्या सूचना तू वेळोवेळी मला देत असतेस. त्यात तुला कुठलाही हलगर्जीपणा चालत नाही. ताई तू आहेस, पण माझी दादागिरी ही तू चालवून घेतेस

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत, तुला सुखी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्य लाभो. कायम आनंदी रहा, हसत रहा”, असे किर्ती पेंढारकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍या…”, तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

दरम्यान किर्तीने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिची बहिण पल्लवी केक कापताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकजण किर्तीच्या बहिणीला शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kirti pendharkar share instagram post for her sister with birthday celebration video nrp