‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका या कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील सुरु झालेली नवा गडी नवं राज्य या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेतील कथानक आणि त्यात येणारे ट्वीस्ट हे सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असं ठेवण्यात आलं आहे. या मालिकेमधून एक वेगळाच विषय प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. नुकतंच या मालिकेतील एका अभिनेत्रीने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे.
अभिनेत्री किर्ती पेंढारकर ही कायमच चर्चेत असते. किर्ती ही सध्या झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य या मालिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेत किर्ती ही वर्षा हे पात्र साकारताना दिसत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांचा आवडतानाही दिसत आहे. नुकतंच किर्तीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. यात तिने मुंबई लोकलमधून प्रवास करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने मुंबईतील महिला पोलिसांचा फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहे.
आणखी वाचा : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीचा मुंबई लोकलने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाली “अनेक वर्षानंतर…”
किर्ती पेंढारकरची पोस्ट
“रात्री उशिरा पॅकअप झाल्यावर थकून घरी जात असताना, अजूनही आपली ड्युटी चोख बजावत असलेले लेडीज डब्यातील महिला पोलीस कर्मचारी जेव्हा आवर्जून येऊन सांगतात कि तुमची ‘नवा गडी नवं राज्य’ सिरीयल खूप छान आहे आणि त्यातलं तुमचं काम मला खूप आवडतं! तेव्हा चेहऱ्यावर हा असा उत्साह येतो.
थँक यू ‘मुंबई पोलीस’ तुम्ही आहात म्हणून रात्री कितीही उशिरा घरी जात असताना तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत याची आम्हाला खात्री असते आणि आम्ही सुखरूप आमच्या घरी पोचतो.आणि त्यासाठी तुम्हाला सलाम”, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
आणखी वाचा : “तुमच्यातील बॉन्डिंग पाहून…” जितेंद्र जोशीचे बोलणं ऐकून ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य भावूक
दरम्यान किर्ती पेंढारकर हिने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली आहे. तिने ललित २०५ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. चोरीचा मामला हा किर्तीने अभिनय केलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात किर्तीने आशा हे पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.